बांधकाम मजुराचे पाल्य असलेल्या वैभव सोनोने यांना मिळाली दीड कोटींची शिष्यवृत्ती
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
वाशीम, 23 जून – वाशीम जिल्ह्यातील पेडगाव येथील बांधकाम मजूर असलेल्या विमल आणि गणेश सोनोने या दांपत्याचा वैभव हा मुलगा आता ब्रिटनला शिक्षणासाठी जातोय. त्याला वेगवेगळ्या तीन विद्यापीठाकडून तब्बल दीड कोटी रुपयांच्या स्कॉलरशिप मंजूर झाल्या असून परदेशात उच्च शिक्षण घेण्याच त्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे.
सोनोने कुटुंब एक वेळ घरात खायलाही काही नसले तरी चालेल मात्र मुलांच्या अभ्यासासाठी पुस्तकं कमी पडू द्यायची नाहीत हेच वैभव च्या आई वडिलांचे ध्येय. वैभवनेही अभ्यासात कधी कुचराई केली नाही. आणि त्याचाच परिणाम म्हणून आता वैभवला चेनविंग अवॉर्ड ही शिष्यवृत्ती युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स मध्ये पर्यावरण व विकास याविषयी अभ्यासासाठी तर कॉमनवेल्थ शेयर्ड स्कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स मध्येच अभ्यासासाठी आणि कॉमनवेल्थ शेयर्ड स्कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंग्लिया यामध्ये शेती आणि ग्रामीण विकास याविषयी अभ्यासासाठी मंजूर झाली आहे. वैभव लवकरच उच्चशिक्षणासाठी ब्रिटनला जाणार आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.