Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीर जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जळगाव, दि. १८ डिसेंबर: ‘वीर जवान अमित पाटील अमर रहे’ च्या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या 183 बटालियन मध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या चाळीसगांव तालुक्यातील मूळगावी वाकडी, येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बुधवार, 16 डिसेंबर 2020 रोजी जम्मूमधील पूंछ भागात अमित पाटील यांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वाकडी येथे शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, यांच्यासह पाटील कुटुंबीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरुवातीस वीर जवान अमित पाटील यांच्या पार्थिवास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. सकाळी नऊ वाजता अमित यांचे पार्थिव घरी आणण्यात आले फुलांनी सजविलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा धरून तरूण पुढे चालत होते. फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांना पोलिस दल व सीमा सुरक्षा दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे लहान बंधू यांनी अग्नीडाग दिला.

वीर जवान यांच्यामागे वडील साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशाली, एक मुलगा, एक मुलगी, एक बहिण, एक भाऊ असा परिवार आहे.



Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.