Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, पोलिंग पार्ट्या रवाना

20 जानेवारीला दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतचे निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

  • हेलिकॉप्टरची मदत घेतल्याने दुर्गम भागातील EVM मशीन घेऊन जाणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी 18 जानेवारी:- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभाग हा दक्षिण भागात मोडत असून येत्या 20 जानेवारीला दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतचे निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

अहेरी उपविभाग हा अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात मोडत असून दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका अहेरी, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, चामोर्शी तालुक्यात होणार आहेत. हे सर्व तालुके जंगलाने व्याप्त असून आजही दुर्गम भागात जाण्यासाठी योग्य दळणवळणाची सोय नाही. अशाच ठिकाणी जंगलव्याप्त खडकाळ ठिकाणी नक्षली संधी साधून घातपात घडवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्कता बाळगत दोन हेलिकॉप्टरची मदत घेतल्याने दुर्गम भागातील मतदान केंद्रावर पोलिंग पार्ट्या, EVM मशीन घेऊन पोहोचण्यासाठी अधिक मदत होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ग्रामपंचायत निवडणूका सुरळीत पार पडण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली येथे बेस कॅम्प करण्यात आले असून याठिकाणी प्रशिक्षण देऊन EVM मशीन व पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर प्रशासनाने ठरविण्यात आलेल्या खाजगी बस, एसटी महामंडळाच्या बसेस ने पोलिसांच्या चोख बंदोबस्तात रवाना करण्यास आज दि. १८ जानेवारी पासून सुरुवात झाली आहे.

जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 20 जानेवारी रोजी 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. 20 जानेवारी रोजी सकाळी ठिक 7.30 वा ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हयातील सहा चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा तालुक्यातील 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये संबंधित गावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या सहा तालुक्यातील 150 ग्रामपंचायतीमधील 2 लाख 49 हजार 638 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला 1 लाख 21 हजार 8955 तर पुरूष 1 लाख 27 हजार 741 आहेत. निवडणूकिसाठी 486 प्रभागामधून 1170 जागांसाठी 2815 उमेदवार आपले मत आजमावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून 2166 कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी 486 मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य घेवून पोहोचत आहेत.

Comments are closed.