Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुकानाची भिंत कोसळून 1 युवक गंभीर जखमी तर चार थोडक्यात बचावले

आलापल्ली येथील घटना आज दुपारी 12 वाजताच्या सलून दुकानाची भिंत कोसळली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली 06 जानेवारी:- आलापल्ली येथील सलून च्या दुकानाची भिंत कोसळून 1 युवक गंभीर जखमी तर चार थोडक्यात बचावले. जखमी युवकाचे नाव सुनील राऊत असल्याचे कळते. ही घटना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापल्ली येथील वीर बाबुराव चौकात बंदुकवार बंधूंचे सलून चे दुकान आहे. नेहमी प्रमाणे आज 12 वाजताच्या सुमारास अनिल व राहुल बंदुकवार त्यांच्या दुकानात आलेल्या गिऱ्हाईकाची दाढी कटिंग करत होते. त्यावेळी भिंतीच्या बाजूला दाढी साठी आलेला युवक सुनील राऊत बसला होता. बंदुकवार सलून यांच्या दुकानाच्या अगदी बाजूला शिवसेना उपजिल्हाप्रमुख धर्मा रॉय व प्रमोद मेश्राम यांच्या मालकीच्या जागेवर बांधकामासाठी सहा फूट खोल खड्डा कालच जे सी बी मशीन द्वारे खोदण्यात आला होता. हा खड्डा खोदताना सुरक्षित अंतर न राखल्यामुळे भिंतिवर दबाव पडुन ती कोसळली. त्यानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन भींतीखाली दबलेल्या जखमी युवकाला बाहेर काढले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर बांधकामाची ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे की नाही या संदर्भात आलापल्ली ग्रामपंचायत ग्रामसेवीका संध्या गेडाम यांच्याशी फोन वर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सुदैवाने त्यावेळी बंदूक वार त्यांच्या दुकानात जास्त ग्राहक नसल्याने मोठी जीवित हानी टळली असली तरीही ही बंदूक वार यांच्या दुकानाचे पाच ते सहा लाखांच्या आसपास नुकसान झालेले आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली होती.घटनेची माहिती होताच पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे ,पो.का जगन्नाथ मडावी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व भिंतीच्या मध्ये आहात कोणी दबून नाही ना याची शहानिशा केली. जखमी युवकाच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून चंद्रपूर ला रेफर करण्यात आले आहे.

Comments are closed.