Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

निर्मल जिल्ह्यातील कुंताला प्राथमिक आरोग्य केंद्रात  42 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चेन्नई, 20 जानेवारी :– देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. लस घेतलेल्या काही जणांमध्ये सौम्य दुष्परिणाम दिसून आले आहेत. पण लस घेतल्यानंतर दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आधी उत्तर प्रदेश आणि आता तेलंगणामध्ये लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाबत समोर आली आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निर्मल जिल्ह्यातील कुंताला प्राथमिक आरोग्य केंद्रात 42 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला 19 जानेवारी, 2020 ला सकाळी 11.30 वाजता कोरोना लस देण्यात आली. लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला. लस घेतल्यानंतर 16 तासांतच आरोग्य कर्मचाऱ्यानं आपला जीव गमावला आहे.

याआधी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील सरकारी रुग्णालयातही एका आरोग्य कर्मचाऱ्याचा लस घेतल्यानंतर मृत्यू झाला होता. पण त्याचा मृत्यू लशीमुळे नाही तर हार्ट अटॅकमुळे झाल्याचं स्पष्टीकरण उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारनं दिलं. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.