Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिकारी कार्यालयातील भरतीबाबत पैसे मागितल्यास तक्रार दाखल करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
तोतया कर्मचाऱ्याकडून उमेदवारांना दूरध्वनीद्वारे पैशांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली:28 सप्टेंबर

जिल्हा प्रशासनाकडून मानधन तत्त्वावर भरती प्रक्रिया सुरू असून याबाबत काही उमेदवारांना निवड यादी मध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत पैशांची मागणी केली जात आहे. याबाबत काही उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही प्रकारे जिल्हा प्रशासनाकडून निवड प्रक्रियेबाबत पैशांची मागणी केली जात नाही. जर याबाबत कोणीही कर्मचाऱ्याचे नाव सांगून पैशाची मागणी करत असल्याचे आढळल्यास आपण संबंधितांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करावी. जिल्हा प्रशासनाकडून भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबविली जाते. जर उमेदवारांना अशाप्रकारे पैसे मागणी होत असल्यास सदर फोनचे कॉल रेकॉर्डिंग करून रीतसर तक्रार दाखल करावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काही उमेदवारांच्या म्हणण्यानुसार सदर व्यक्ती हिंदीमध्ये संभाषण करत असून ती परराज्यातील असल्याचा अंदाज आहे. सदर व्यक्ती बाबत शंका आल्याने संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला. अशाप्रकारे कोणत्याही उमेदवाराला कोणी पैशांसाठी संपर्क साधला असता उमेदवारांनी संबंधितास पैसे देऊ नये. सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कोणीही पैसे मागितल्यास रीतसर तक्रार दाखल करावी असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.