आलापल्ली येथे धोबी समाजासाठी समाज भवनाचे भूमिपूजन
जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापली 09 फेब्रुवारी:- आलापल्ली येथील बजरंग चौक नजीक धोबी समाजाच्या समाजभवनाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. धोबी समाजाच्या सांस्कृतीक तथा परम्परागत रूढी परंपरा, चालीरीती यांची जोपासना करण्यासाठी व समाजाचे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यासाठी समाजभवन नसल्याने अडचण निर्माण होत होती.
धोबी समाजबांधवानी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून समाजभवनाची मागणी केली असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला असून येत्या काही दिवसांत समाज भवनाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते समाज भवनाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला.
या भूमिपूजनाला धोबी समाज मंडळाचे संतोष वर्मा, मोरेश्वर मेडपल्लीवार, शंकरराव यमकुर्तीवार,एकनाथ गुंडावार, प्रकाश मेडपल्लीवार, संजय मेडपल्लीवार, तर माजी उपसरपंच दिलीप गंजीवार, माजी ग्रांप सदस्य संतोष तोडसाम, चंदू बेज्जलवार,जुलेख शेख, ग्रामसेवक संध्या गेडाम, कनिष्ठ अभियंता रामटेके सचिन वर्मा, जुनेद शेख, आदिची उपस्थिती होती.
Comments are closed.