Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात एक मृत्यू, 6 पॉझिटिव्ह सह 9 कोरोनामुक्त

  • जिल्ह्यात दोन लाख कोरोना तपासण्या
  •  आतापर्यंत 22,554 जणांची कोरोनावर मात
  •   ॲक्टीव पॉझिटिव्ह 128

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर, 31 जानेवारी :- जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 456 नमुने संकलीत करून कोरोना तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी एक लाख 75 हजार 375 नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह तर 23 हजार 74 नमूने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.‍ एक हजार 335 अहवाल प्रतिक्षाधीन असून 672 नमून्यांचा निष्कर्ष निघालेला नाही.

मागील 24 तासात 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 6 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीचा मृत्यू झाला आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 554 झाली आहे. सध्या 128 बाधितांवर उपचार सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज मृत झालेल्यामध्ये राजूरा येथील 69 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 392 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 353, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या सहा रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील तीन, बल्लारपूर एक, भद्रावती एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे. कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Comments are closed.