चंद्रपूर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर डेस्क 28 डिसेंबर :- नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील खरेदी केंद्राला भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल हे तालुके जोडण्यात आले आहेत. तसेच वरोरा केंद्रला वरोरा तालुका, चिमुर केंद्राला ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभिड तालुके, गडचांदुर केंद्राला कोरपना व जिवती तालुके तर राजुरा खरेदी केंद्राला गोंडपिपरी हे तालुके जोडण्यात आले असून संबंधीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे दिलेल्या केंद्रावर तुर खरेदीसाठी नोंदणी करावी.
शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शेतीचा 7/12, बँक खाते पासबुक, इ. संपुर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.आ.गोगीरवार यांनी कळविले आहे.
Comments are closed.