Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी,चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील महिला बचत गटांना नवीन रेशन दुकाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 17 ऑगस्ट: अहेरी ,चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील लोकसंख्या वाढीमुळे आवश्यकतेनुसार काही गावांकरीता नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजुर करण्याकरीता स्वयंसहायता महिला बचत गट यांचे कडुन अर्ज मागविण्यात आले आहेत. अहेरी, चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील गांवाकरीता नवीन रास्त भाव दुकान परवाने देण्याकरीता इच्छुक स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी संबंधित तहसिलदार यांचे कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंत त्यांचेकडेच सादर करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजुर करावयाचे अहेरी तालुक्यातील गावांमध्ये दाडगेर, चौडमपल्ली, कोडेसेपल्ली, आपापल्ली, चिंतलपेठ, दामरंचा, गुंडेरा, येंकाबंडा, मांड्रा, आलापल्ली गावात २, पुसूकपल्ली, रेपनपल्ली, चिरेपल्ली, अहेरी, मोदुमतुरी, महागावं खु, महागांव, यांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील गावांमध्ये ठाकुरनगर, नवग्राम, सिमुलतला, मुधोली तुकूम, नवेगांव पेठ(घोट), माडेमुधोली, चकचापलवाडा, मक्केपली चक नं.3, जानाळा तुकूम, चाकलपेठ, कळमगाव, आमगांव चक नं.2, नवरगांव, कुथेगांव, मुधेली चक नं.2, रायपूर, बेलागट्टा, लेनगुडा यांचा समावेश आहे. नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजुर करावयाचे भामरागड तालुक्यातील गावांची यादी पुढिल प्रमाणे- विसामुंडी, खंडीनैनवाडी, मरकनार, कियर, बोटनफुंडी , होडरी , लष्कर ,कोसफुंडी, भामरागड -2 ,इरपनार , नेलगुंडा , मिडदापल्ली , भटपर , मडवेली , झारेगुडा यांचा समावेश आहे. नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजुर करावयाचे मुलेचरा तालुक्यातील गावांची यादी पुढिल प्रमाणे- कालीनगर, देवदा, कोलपल्ली, मुखडी, भगतनगर, वेग्नुर, यांचा समावेश आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

जिल्हात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

अखेर… खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात पालकांना मोठा दिलासा

 

जन्मदिवशी आईला हेलिकॉप्टरमधून मुलांनी घडविली सैर !

Comments are closed.