आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
- हिंगणघाट तालुक्याच्या बोरगाव (दातार) येथील घटना.
वर्धा दि १४ जानेवारी :- हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव (दातार) येथील शिवारात आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत . मृत मोरांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार असून अहवाल आल्यावर त्यांचा मृत्यू कशाने झाला आहे हे स्पष्ट होणार आहे.
वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी बोरगाव (दातार) येथील नाल्याच्या बाजूला हे आठ मोर मृतावस्थेत आढळून आले . यामध्ये एक नर तर सात मादी असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय.
सध्या राज्यात बर्ड फ्लूची साथ सुरू असल्याने घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोरांची पाहणी केली. मृत मोरांपैकी पक्ष्याचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहे. पुण्यात तपासणीनंतर मोरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या बर्ड फ्ल्यूची साथ सुरू आहे. अशात आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहेय. वनविभागाच्या वतीनं पुढील कारवाई केली जात आहे.
Comments are closed.