पुणे विद्यापीठात एम.एससीच्या प्रवेशासाठी एसबीसी आरक्षण द्या
एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र च्या वतीने ना.विजय वडेट्टीवार यांना निवेदन.
गडचिरोली डेस्क 30 डिसेंबर :- पुणे विद्यापीठात एम.एससी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एसबीसी ला २% स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी एसबीसी अन्याय निवारण कृती समितीतर्फे राज्याचे बहुजन कल्याण मंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली. गडचिरोली येथिल अंकुश किशोर लिंगलवार या एसबीसी (पद्मशाली ) विद्यार्थ्यांने मागील वर्षी बी.एससी.पदवी घेतली असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता पुणे विद्यापीठात एम.एससी. भौतिकशास्त्र या विषयात प्रवेश घेण्यासाठी आनलाईन अर्ज सादर केला होता. मात्र आनलाईन अर्जामध्ये एसबीसीचे कॉलम होते परंतु निवड यादीमध्ये एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही .
त्यामुळे असबिसीवर अन्याय होत असल्याने याबाबत एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र च्या वतीने ना.विजय वडेट्टीवार यांच्याशी प्रत्यक्ष सवांद करून एसबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्याला न्याय देण्याची समितीच्या वतीने निवेदन देवून मागणी करण्यात आली.
Comments are closed.