Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अशोक नेते यांच्या हस्ते बोधली धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 19 जानेवारी:- मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली च्या वतीने विकास सहकारी तांदूळ गिरणी मर्या. घोट द्वारे गडचिरोली तालुक्यातील बोधली खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भाजप किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी सर्वप्रथम विधीवत पूजा अर्चा करून फित कापून धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. तदनंतर सर्व शेतकऱ्यांना नोंदणी व सातबारा संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. व कागदपत्रांची पूर्तता करून सुरळीत धान विकण्याचे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले. तसेच हमाली व दराबाबत व खरेदी बाबत सविस्तर माहिती सोसायटी च्या व्यवस्थपक संगीता उपटलावार यांनी दिली.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, माजी सरपंच भगवंत चिलंगे, ज्येष्ठ नागरिक बाबुराव गेडाम, महागुजी पिपरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आशिष मोगरकर, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणपत पंदिलवार, देवेंद्र पिपरे, भाजपचे नितीन कुनघाडकर, सहकारी सोसायटी चे अध्यक्ष वसंत दुधबावरे, उपाध्यक्ष वासुदेव भोवरे मानद सचिव गुरुदास वैरागडे, व सर्व संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व शेतकऱ्यांचे सातबारे घेऊन जास्तीत जास्त धान खरेदी करण्याच्या सूचना खास.अशोक नेते यांनी मार्केटिंग फेडरेशन व सोसायटीला दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.