कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 18 फेब्रुवारी:- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटूंबाला शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 % अनुदानावर उपलब्ध करुन द्यावयाची आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे, त्यांनी विकत असलेल्या जमिनीचा सातबारा ( 7/12 ) जमिनीचा नकाशा, धारण करीत असलेल्या जमिनीचा तपशिल (नमुना 8 अ), जमीन मोजणीची ‘ क ‘ प्रत, गांव नकाशा, 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर शपथपत्र इ. माहितीसह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा.
शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2018 नुसार जमीन खरेदीची कार्यवाही करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली केले आहे.
Comments are closed.