कोरची येथील पारबताबाई विद्यालयात किशोरवयीन आरोग्य दिवस.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची डेस्क 29 डिसेंबर:- पारबताबाई विद्यालयात किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. शाळेत ९ वी १० वी चे वर्ग सुरू असून शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
किशोरवयीन मुलांमध्ये बरेच शारीरिक बदल होत असतात. सोबतच या काळात शरीराची योग्य काळजी घ्यावी लागते. सध्या देशात कोरोना संसर्गाची साथ पसरली आहे. या काळात अंतराचे पालन, नियमित मास्क वापरणे, आणि सानिटायझर वापरणे तसेच गर्दीत जाणे टाळले पाहिजे.
यावेळी विद्यार्थ्यांची एचबी तपासण्यात आली.व मुलींना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी आरोग्य सेविका के. एस. रहाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य सेविका आर जी कुमरे, आशा वर्कर कांता मोहुर्ले. सहायक शिक्षिका एन डी मडावी उपस्थित होते.
Comments are closed.