Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयुष्मान भारत योजना अंतर्गत लाहेरी येथे नाव नोंदणी शिबिर प्रारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 27 फेब्रुवारी:- पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, सोमे मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली ,उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे पुढाकारातून व लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर व इतर अधिकारी, अंमलदार यांचे परिश्रमातून उप पोस्टेला लाहेरी येथे आयुष्मान भारत योजना अंतर्गत लाभार्थी नाव नोंदणीस सुरुवात करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शासन विविध लोकाभिमुख योजना सर्वसामान्यांसाठी जरी राबवत असले तरी त्यासाठी आवश्यक यंत्रणेचा अभाव तर कधी कुचकामी व अपुरी यंत्रणा असल्याने अनेक वेळा या योजनांपासून लाभार्थी वंचितच राहतात. पंतप्रधान जन आरोग्य योजना ही आयुष्मान भारत या नावाने प्रचलित आहे या अंतर्गत कुटुंब हे एकक मानून प्रत्येक कुटुंबाला प्रति वर्ष पाच लाख रुपये पर्यंतचा वैद्यकीय उपचारासाठी चा आलेला खर्च हा शासनाकडून संबंधित रुग्णालयास अदा केला जातो यातून आवश्यक व दर्जेदार वैद्यकीय उपचार हा जगण्याच्या मूलभूत हक्कात येतो हे शासनाने अधोरेखीत केले आहे. परंतु गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये अद्यापही कित्येक लोक माहितीअभावी तसेच परिपूर्ण यंत्रणा अभावी आजही या योजनेपासून वंचित आहेत.

परिणामी दारिद्र्याने पछाडलेल्या या भागातील रुग्णांना आपल्या तुटपुंज्या मिळकतीतील एक मोठा हिस्सा हा वैद्यकीय सेवांसाठी व्याय करावा लागतो. या अगतिकतेतून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातर्फे पोलीस दादालोरा ही एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत उप पोस्टेला लाहेरी येथे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड नोंदणीची सुरुवात करण्यात आली असून आता नागरिक उप पोस्टेला येऊन त्यांची नाव नोंदणी करू शकतात ही घरपोच सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून लाहेरी चे प्रभारी अधिकारी व इतर अधिकारी अंमलदार तसेच सामान्य सेवा केंद्र संचालक राजेंद्र कोठारे यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी घेतलेले परिश्रम व पुढाकार हे नक्कीच कौतुकास्पद आहे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.