Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रतिबंधित व शांतता क्षेत्रात, 31 डिसेंबरला फटाके बंदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क 28 डिसेंबर:- नवीन वर्षाचे स्वागत करताना नागपूर महानगर व जिल्ह्यात प्रतिबंधित व शांतता क्षेत्रात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली. सोबतच या काळासाठी जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे 31 तारखेला फटाक्याच्या लडी, अधिक आवाज करणारे फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.

नूतन वर्ष साजरा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लोक मोठ्या प्रमाणात फटाके उडवितात व फोडतात. यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होवून शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक हिताच्या आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 1 जानेवारी 2021 पर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 जिल्ह्यात लागू केली आहे. उत्सवाच्या काळात या आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती कलम 188 मधील तरतुदीनुसार कायदेशीर शिक्षेस पात्र राहील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शहरातील पेट्रोल पंप, सिलेंडर, गोडाऊन, केरोसीन तेलाचे डेपो, फटाक्याची दुकाने, ज्वालाग्राही पदार्थांचे डेपो, रासायनिक पदार्थांचे डेपो, दुकाने वस्ती अथवा बाजारपेठेत आहेत तेथील स्थानिक लोकांकडून व्यापाऱ्याकडून सदर ठिकाणाजवळ फटाके व राकेट इत्यादी फोडले गेल्यास फटाक्यांची ठिणगी पडून त्याद्वारे स्फोट होवून मोठ्या प्रमाणात आग लागण्याची व जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व ठिकाणी 200 फुटाचे आत फटाके उडविण्यास मनाई करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा, फटाके उडविण्याचे जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत 110 ते 115 डेसीबल पेक्षा जास्त होता कामा नये. शाळा कॉलेज, रुग्णालय, न्यायालय इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोन मध्ये येतात. त्या भागात 100 मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई आहे. फटाक्याच्या लडी, मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित करणारे फटाके, आवाज व घन कचरा तयार करणारे फटाके फोडणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उडणारे दिवे व कंदील आदी उडविण्यास मनाई आहे. हरित लवादाच्या आदेशानुसार ग्रीन फटाके वगळता इतर सर्व प्रकारचे फटाके विकणे, फोडणे व उडविणे यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

Comments are closed.