वाघिणीचा परिवार पर्यटकांसाठी ठरतोय पर्वणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भंडारा डेस्क २९ डिसेंबर :- पवनी अभयारण्यात पर्यटनाला निघाल्यानंतर व्याघ्र दर्शन व्हावे हीच इच्छा प्रत्येकाच्या मनी असते. सध्या अशी इच्छा मनात धरून उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी खापरी प्रवेशद्वाराने पर्यटन पर्यटनासाठी निघणाऱ्या पर्यटकांची इच्छापूर्ती होत आहे. एक वाघीण तिच्या बसण्याचा नियमित दर्शन देत असल्याने पर्यटकांचा ओढा ही या दिशेने वाढला आहे.
उमरेड कऱ्हांडला पवनी अभयारण्याची कीर्ती सध्या पसरू लागली आहे.
दिवसेंदिवस अधिक प्रमाणात होणारे व्याघ्रदर्शन पर्यटकांना या अभयारण्याकडे घेऊन येत आहे. विशेष करून पवनी तालुक्यातील खापरी प्रवेशद्वारातून पर्यटनासाठी निघणाऱ्या पर्यटकांना मागील काही दिवसांपासून नियमित एका वागण्याचे दर्शन होत आहे. आपल्या बछड्यासह दर्शन देणारी ही वाघीण सध्या पर्यटकांसाठी केंद्रबिंदू आहे. 28 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा या वाघिणीने सहकुटुंब दर्शन दिले. त्यामुळे वन्यजीव प्रेमींसाठी सरते वर्ष चांगलं काही देऊन जात असल्याची चर्चा आहे. वाघिणीच्या दर्शनामुळे पर्यटकांचा वाढलेला ओढा या भागात बेरोजगारांना रोजगार देण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा करीत आहे.
Comments are closed.