रासेयो स्वयंसेवकांनी केले अहेरी तालुक्यातील ३० गावात दारू, तंबाखू व्यसनावर होणाऱ्या खर्चाचे सर्वेक्षण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 12 जानेवारी :- शोध ग्राम येथील संस्थेच्या वतीने तंबाखू व दारू या व्यसनावर होणाऱ्या खर्चाबाबत चे सर्व्हेक्षण अहेरी तालुक्यातील एकूण 30 गावात, राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथील रासेयो स्वयंसेवकांनी नुकतेच केले. सर्व्हेक्षण 9 जानेवारी ते 11 जानेवारी 2021 या कालावधीत करण्यात आले.
सदर सर्वेक्षण महाविद्यालयातील रासेयो विभाग व शोध ग्राम येथील सर्च कार्यकर्ते चरणदास साहारे, जितेंद्र साहारे,राजेंद्र इसासारे, पुणेश्र्वर भूरले,आनंदरावदुधबळे,यांनी सर्वेक्षण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले व प्रशिक्षण दिले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.यू.टिपले यांनी सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील लोकांच्या अडचणी समजून घेण्याचे आव्हान केले.
सदर सर्वेक्षण रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डी. टी.डोंगरे,प्रा.पी.डी.सोनुले,सर्च टीमचे जितेंद्र सहारे,राजेंद्र इसासरे, पूनेश्वर भुरले,आनंदराव दुधबले,चरणदास साहारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व्हेक्षण यशस्वी करण्याकरिता सूरज सिडाम,रोशन मडावी,गणेश तलांडी,अनिमेश दुर्गे,अजित पवार,मनीष सोनुले,रोशनी राऊत,नंदिनी गुरणुले,रुपाली चौधरी,प्रणाली तलांडे यांचे विशेष सहकार्य मिळाले
Comments are closed.