बिरसी विमानतळ गोंदिया वरून लवकरच सुरू होणार उड्डाण
खासदार अशोक नेते यांची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांशी चर्चा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. 8 जून:- गोंदिया येथील बिरसी विमानतळ बनून पूर्णपणे तयार आहे मात्र या विमानतळ वरून विमानाचे उड्डाण अजूनही सुरू झालेले नाही आज दि . 8 जून रोजी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय उड्डयन मंत्री मा. हरदीपसीह पुरी यांची दिल्ली येथे भेट घेतली व बिरसी विमानतळ वरून विमानांचे उड्डाण सुरू करून मुंबई व दिल्ली करिता विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली.
खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मा श्री हरदिपसिहजी पुरी यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांचा आंतरराष्ट्रीय संपर्क मोठा असून येथील नागरिकांना नियमित विदेशात यात्रा करावी लागते यात गोंदिया वरून नागपूर, मुंबई तथा दिल्ली येथे जाऊन त्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो व तिथे जाण्यासाठी ट्रेन ने जाण्यास 1-2 दिवसाचा कालावधी लागतो परिणामी नागरिकांची अडचण होत आहे त्यामुळे गोंदिया वरून मुंबई व दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी केली. तसेच गोंदिया-इंदोर- हैदराबाद मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी मान्यता प्रदान करण्यात आली मात्र अजूनही विमानसेवा सुरू झालेली नाही. या मार्गावर यथाशिग्र विमानसेवा सुरू करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे केली तसेच गडचिरोली येथे प्रस्तावित विमानतळच्या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली.
यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी बिरसी ( गोंदिया) विमानतळ वरून लवकरच विमानाचे उड्डाण सुरू होईल व मुंबई व दिल्ली साठी विमानसेवा सुरू करण्यासाठी यथाशिग्र उचित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
Comments are closed.