रस्त्याचे निकृष्ट बांधकाम दस्तूरखुद्द कंत्राटदार अपघातातून बचावले
एका महिन्यात मुख्यमंत्री,पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत सडक उखडला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची 14 फेब्रुवारी:- कोरची तालुक्यात कोट्यावधीरुपये खर्च करुन नव्याने बांधकाम करीत असलेले पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेचे बेडगाव -बेलगाव – बोरी रस्ताचे एक महिना आधी झालेले निकृष्ट दर्जाचे बांधकामा वर रस्ता उल्लेखलेल्या खड्डा चुकवण्यासाठी प्रयत्न करीत असताना कुरखेडा येथील कंत्राटदार बब्बू मस्तान यांच्या चार चाकी वाहनाचा अपघात झाल्याने थोडक्यात बजावल्याने अनर्थ टाळला तालुक्यातील मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजनेच्या कामांची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बेलगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा शिवसेना नेते अशोक गावतुरे यांनी केली आहे.
कंत्राटदार कडून वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी टक्केवारी मागणे म्हणजे रस्त्याचा सत्यानाश आहे जो प्रत्यक्षात काम करतो आहे त्याचा नफा या टक्केवारी मुळे कमी होतो आणि रस्ताचा दर्जावर, गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो, हे मला नको आहे असे केंद्रीय रस्ते विकास महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले असताना कोरची तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकाम जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एका महिन्यात आगोदर बेडगाव -बेलगाव -कोहका -जामनारा या रस्ताचे बांधकाम प्रमोद कन्ट्रक्शन कंपनी कडून केले जात असून निकृष्ट दर्जाचे आहे या रस्तावर शासनाच्या करोडो रुपये खर्च केले जात आहे पण रस्ताची गुणवत्ता मात्र शुन्य आहे त्या मुळे कुरखेडा वरून कोडगुल कडे जात असलेले कंत्राटदार बब्बू मस्तान यांच्या गाडीचा अपघात जामनारा समोरील उकडलेल्या रस्ता वरील खड्डा चुकवण्यासाठी पर्यंत करीत असताना रस्तावर खूप जास्त प्रमाणात टाकलेल्या चूरी गीटटी वरून जात असताना नियंत्रण गेल्याने अपघात झाला पण सुदैवाने कसलीही दुखापत झाली नाही ते थोडक्यात बचाव लयाने अनर्थ टळला आहे पण असे रस्ता वर बरेच अपघात झाले असून या अगोदर रामलाल नुरूटी बेलगाव यांच्या मुलाचा अपघात होऊन खूप मोठी दुखापत झाली होती तेव्हा त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आठ दिवस उपचार केले होते.
आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्या मोबदल्यात कंत्राटदार कडून टक्केवारीची अपेक्षा करणार्या तसेत त्यासाठी कंत्राटदारांना त्रास देणाऱ्या लोकप्रतिनिधी वर गडकरी जाम नाराज आहेत. प्राप्त माहितीनुसार गडकरी यांनी सीबीआय ला आपल्या कार्यालय बोलावून असा लोकप्रतिनिधी वर कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नक्षलप्रभावी कोरची तालुक्यात तत्कालीन राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कोरची तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजनेच्या अंतर्गत कोरची -बेतकाठी -बोरी, भिमपूर -नांदळी -जैतानपार, बेलगाव -सातपूती -बेलगाव,जांभळी-कोरची, बोरी -कोडगुल, कोडगुल -खसोडा,कोडगुल-वाको, देऊळभटटी -गोटाटोला, गोटाटोला -कामेली ग्यारापती-मोठाझेलीया, वडगाव – ग्यारापत्ती असे 12 कामाना कोट्यावधी रुपयांची निधी उपलब्ध करून दिले पण आचारसंहिता लागू होणार म्हणून विरोधी पक्षाच्या स्थानी लोकप्रतिनिधी डावलून भूमीपूजन करुन घेतली होती भूमीपूजना नंतर दोन वर्षा नंतर खूप निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याने या कामाची देखरेख करीत असलेल्या कनिष्ठ अभियंता, उप अभियंता व कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले तरी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची आर्थिक परिस्थिती दर्जेदार होत असल्याचे दिसून येत आहे.
तालुका मुख्यालया पासुन चार किमी अंतरावरील कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल तरी वरील तालुक्यातील संपूर्ण कामांचे विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बेलगाव ग्रामपंचायत उपसरपंच तथा शिवसेना नेते अशोक गावतुरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना व जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.
Comments are closed.