Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चिमूर मंडळ अधिकाऱ्याने पकडलेला रेतीचा ट्रक हुलकावनी देऊन फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 27 फेब्रुवारी:- शंकरपूर येथील मंडळ अधिकारी यांनी रेती भरलेला हायवा ट्रक शंकरपुर बस स्थानकावर पकडला परंतु त्यांची नजर चुकवून रेती भरलेला हायवां ट्रक पसार झाला ही घटना शनिवार ला सकाळी सात वाजता घडलेली आहे. प्राप्त माहितीनुसार शंकरपूर येथील मंडळ अधिकारी डी एल बुराडे यांना रेती भरलेला हायवा ट्रक ( ट्रक क्र MH40 BG3536 ) येत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी खैरी येथे सापळा रचला तेथून आपल्या चारचाकी वाहनाने हायवा ट्रक चा पाठलाग केला आणि शंकरपुर बसस्थानकाजवळ पकडला याची माहिती त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली सोबतच शंकरपुर पोलीस चौकी ला ही माहिती दिली हे माहिती देत असतानाच ट्रक चालक ट्रक घेऊन शंकरपूर भिसी रस्त्याने पडू लागला या वाहनाचा पुन्हा मंडळ अधिकाऱ्याने पाठलाग केला पाठलाग करत असतानाच आंबोली जवळ एका दुसऱ्या चारचाकी वाहनाने यांचा रस्ता अडवला हा रस्ता जवळपास पंधरा मिनिटे रोखून ठेवला होता त्या चारचाकी वाहनात तीन ते चार व्यक्ती बसून होते.

त्यामुळे मंडळाधिकारी आपल्या वाहनातून उतरलेच नाही तोपर्यंत ट्रक तिथून पसार झाला आणि आंबोली येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळ रेती खाली करून पडून गेला जेव्हा त्या चारचाकी वाहनाने अडवलेला रस्ता सोडून दिला तेव्हा मंडळ अधिकारी यांनी पुन्हा वाहन हायवा ट्रक ज्या दिशेने गेला त्या दिशेने आपली चार चाकी वाहन नेले तेव्हा आंबोली ग्रामपंचायत जवळ रेती खाली करून दिसल्याने त्या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला पंचनामा करून त्या रेतीचा लिलाव करण्यात आलेला असून एकवीस हजार रुपयाला विकण्यात आलेली आहे याबाबत मंडळ अधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालय चिमूर येथे अहवाल सादर केला असून त्या हायावा ट्रक व चालकास शोध घेण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.