वर्धा उत्तम गालवा स्टील प्लॅन्ट स्फोट, 35 मजूर भाजले
कंपनी प्रशासन म्हणतंय हा विस्फोट नाही ही आग आहे
कम्पनी प्रशासनाची सावरती भूमिका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा 03 फेब्रुवारी :- भुगाव येथिल उत्तम गालवा स्टील प्लॅन्ट येथे सकाळच्या सुमारास अचानक ब्लास्ट फर्निश मध्ये आग लागली. सुरवातीला स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली होती कंपनी प्रशासनाने सावरती भूमिका घेत आपली भूमिका मांडली आहे. ब्लास्ट फर्निशमध्ये हा अपघात घडला.
ब्लास्ट फर्निशमध्ये हा अपघात घडला त्यामुळे ट्यू एअरमधून गरम हवा आणि बारीक कण उडाले असल्याची माहिती कम्पनी व्यवस्थापनाने दिली आहे. त्यात जवळपास 35 कामगार भाजून जखमी झाले आहे. त्यातील 25 जण सावंगी, 10 मजुरांना सेवाग्राम येथे पाठवण्यात आले आहे. 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्यामुळे 10 जण जास्त गंभीर जखमी आहे. दोन ते तीन जणांना नागपूरला उपचाराला पाठवणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या प्रकरणात घटने संदर्भात कामगार अधिकाऱ्यामार्फत चौकशी प्रस्तावित करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली आहे. जिल्ह्याचे महसूल प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाली आहे.
Comments are closed.