Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल दिनांक ३० एप्रिल ते १ मे २०२५ रोजीपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी २ वाजता मुख्य वनसंरक्षक कार्यालय येथे आगमन व गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागाच्या कामांचा आढावा. दुपारी ४ वाजता अधिक्षक अभियंता कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आगमन व गडचिरोली जिल्ह्यातील बांधकाम विषयक कामांचा आढावा. सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजना व इतर विकास कामांबाबत आढावा. सायंकाळी ७ वाजता सक्षम आय.ए.एस.अकादमी येथे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व अकादमीच्या संचालकांसोबत विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत चर्चा. संध्याकाळी ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गुरुवार दिनांक १ मे रोजी सकाळी ७.५५ वा पोलिस कवायत मैदान येथे आगमन. सकाळी ८ वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन व अनुषंगिक कार्यकमास उपस्थिती. सकाळी ९ वा. पोलिस कवायत मैदान येथेनू शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण व राखीव. सोयीनुसार नागपूरकडे प्रयाण.

Comments are closed.