Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पूरग्रस्तांच्या मदतीत भेदभावावरून वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा

आपच्या अॅड. परोमिता गोस्वामी यांची पत्रपरिषदेत मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. १४ डिसेंबर: पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना न्याय न दिल्याने शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव घेतली असून याप्रकरणी मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आपच्या नेत्या अॅड. परोमिता गोस्वामी यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ब्रम्हपुरी येथील पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. कोकणातील चक्रीवादळग्रस्तांना भरभरून मदत करणारे मदत आणि पुनर्वसन विभाग पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांबाबत भेदभाव करतात. कोकणातील चक्रीवादळग्रस्तांना १.५० लाख तर, पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना केवळ ९५ हजार रुपये दिले जात आहे. कोकणातील चक्रीवादळग्रस्तांचे तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यात आले. मात्र पूरग्रस्तांना भरमसाठ वीज बिले पाठवण्यात येत आहे. शेतीची नुकसान भरपाई ३० सप्टेंबरपर्यंत १८ हजार हेक्टरप्रमाणे देण्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी दिले होते. मात्र मदत मिळाली नसून, आता ती १३,६०० रुपये हेक्टर देण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आपल्याच मतदार संघातील मतदारांसोबत पालकमंत्री वडेट्टीवार हे दुजाभाव करीत असून ते पूरग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांनी अखेर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. हे पालकमंत्र्याचे अपयश असून, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अॅड. परोमिता गोस्वामी यांनी केली आहे.        

Comments are closed.