अश्लील फिल्म बघून त्याची नक्कल करणे नडले तरुणाच्या जीवाशी
नागपूर, दि. ०८ जानेवारी: मोबाईलवर अश्लील फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारच्या पोजिशन मध्ये शाररिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉज वर घडली आहे. मृत हा २७ वर्षीय तरुण आहे, तो इंजिनिअर असून सध्या बेरोजगार असल्याची माहिती पुढे आली आहे.
मृत तरुण आणि २० वर्षीय तरुणी मध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. गुरुवारी दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजमधील एक खोली बुक केली होती. तिथे गेल्यानंतर दोघांनी शाररिक संबंध प्रस्थापित केले.
यावेळी वेगवेगळ्या पोजिशन मध्ये शाररिक संबंध करतांना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले, त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याच्या भवती सुद्धा अवळण्यात आली होती. यानंतर ती तरुणी बाथरूम मध्ये गेली असता तो तरुण खुर्ची सह खाली कोसळला, ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला होता, ज्यामुळे त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ती तरुणी बाथरूम च्या बाहेर आली, तो पर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली होती, त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Comments are closed.