58 वर्ष्याचा RSS चा गड आम्ही उद्धवस्त केला – विजय वडेट्टीवार
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ५ डिसेंबर: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते ना. विजय वडेट्टीवार आज औरंगाबाद वरून नागपूर येथे जात असतांना जालना येथे थांबले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर पदवीधर निकालावर बोलतांना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ५८ वर्ष्याचा RSS चा गड आम्ही उद्धवस्त केला एकाच विचाराचा माणूस त्याठिकाणी सातत्याने निवडून येत होता, आज OBC जागृत झाला महाविकास आघाडीवर जनता खुश होती जनता, विचारवंत, पदवीधर,शिक्षक खुश होता,यासर्वांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कारकीर्द वर यशाचा शिक्का मारला आहे.
नागपूर पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी दोन रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. पहिलं म्हणजे, गेल्या ५८ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने झेंडा फडकवला. त्यासोबतच अभिजीत वंजारी यांनी मतांचाही रेकॉर्ड मोडला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांना रेकॉर्डतोड मतं पडली आहेत. मतांच्या बाबतीत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही मागे टाकलं आहे.
नागपूर पदवीधर मतदार संघात अभिजीत वंजारी यांनी ५८ वर्षांपासूनचा भाजपचा गड काबीज केला. त्यांनी भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. अभिजीत वंजारी यांना या निवडणुकीत ५५ हजार ९४७ मतं पडली. ही मतं गेल्या १८ वर्षातील सर्वाधिक मतं आहेत.आणि त्याबरोबर OBC च्या लोकांनी घेतलेली कणखर भूमिका मुळे महाविकास आघाडीचा हा विजय असल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते ना. विजय वडेट्टीवार स्पष्ट केले.
Comments are closed.