Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू – नवाब मलिक

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊच पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. ३० जून : आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल परंतु आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरू असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान राज्यपाल विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्ष पदाची निवडणूक लवकर करा असे सूचित करत आहेत मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत तोपण विषय प्रलंबित आहे तो निकाली काढलात तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील असे सांगतानाच असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी राज्यपाल यांना आज पुन्हा एकदा करुन दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊच पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा अशी विनंतीवजा आग्रह नवाब मलिक यांनी राज्यपाल यांना केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नागदेवता मंदिरा नजीक भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत एक गंभीर तर दोन जखमी

गडचिरोली जिल्ह्यात आज 13 कोरोनामुक्त तर 19 नवीन कोरोना बाधित

राष्ट्रीय महामार्गालगत शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू

Comments are closed.