Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आता कोण होणार विधानसभा अध्यक्ष? नाना पटोलेंनी दिलं उत्तर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, 5 फेब्रुवारी : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत नाना पटोले यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानले. त्यांनी मोठी अनुभवी टीम सोबत दिली असून थोड्याच दिवसात काँग्रेस पक्ष 1 नंबर आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

मोठ मोठे मंत्री संघटनेला वेळ देवू शकत नाही यामुळे इतरांना संधी देताना जातीय प्रादेशिक विचार पक्षाने केला आहे. यामध्ये भाजप आमचा स्पर्धक विरोधक असेल. महाविकास आघाडीत मित्र पक्षात स्पर्धा नसेल. मात्र भाजपने खोटे आश्वासन देत सत्ता स्थापन केलंय हे जनतेला सांगायच आहे. डिझेल पेट्रोलची दरवाढ यावर आवाज उठवला जाईल. मित्रपक्ष सोबत वाद होण्याचं कोणतंही कारण नाही. विधानसभा अध्यक्ष कोण होईल याबाबत तीन पक्षाचे सरकार सोनिया गांधी, शरद पवार आणि ठाकरे हेच चर्चा करतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारे बदल अखेर हाय कमांडने केले आहेत. विद्यमान कार्यकारिणीतल्या अनेक मोठ्या नावांना आणि मंत्रिपदावरच्या व्यक्तींना फाटा देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदी चर्चेत होतंच. त्याप्रमाणे त्यांना राज्यातले मोठं पद देण्यात आलं आहे. पटोले यांनी अगोदरच विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष पक्षाने राज्यात नेमले आहेत आणि 10 उपाध्यक्षपदाचे चेहरे दिले आहेत. विद्यमान कार्याथ्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना हटवलं आहे. त्याऐवजी चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

Comments are closed.