बॅलेट पेपरवर निवडणुक घेण्यास महायुती सरकार एवढे का घाबरत आहे? मा. आमदार विजय वडेट्टीवार यांचा सवाल
ईव्हीएमच्या भरवशावर सत्ता मिळविल्याचा आरोप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : दि. १२ डिसेंबर रोजी मा. आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते, श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे वाढदिवसाचे ओचीत्य साधून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात १२ डिसेंबर रोजी आमदार विजय वडेट्टीवार व आरमोरीचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांचा सत्कार सोहळा पार पडला.
सत्कार समारंभात बोलत असतांना माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, जे देश आपल्यापेक्षा ५० वर्षे पुढे आहेत, त्या देशात देखील ईव्हीएम वापरले जात नाही. तिथे बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही लक्षणीय यश मिळवून सत्तेपर्यंत पोहोचू अशी आशा होती. मात्र, ईव्हीएममुळे ही अपेक्षा भंग पावली. हे सरकार ईव्हीएमच्या भरवशावर सत्तेत आल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.
एवढेच जनमत महायुतीच्या बाजूने असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास का घाबरता, असा सवालही त्यांनी सत्ताधारी पक्षावर केला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जीवन नाट, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर, अॅड. राम मेश्राम, हसन गिलानी, समशेर खान पठाण, सोनटक्के, पांडुरंग घोटेकर, अब्दुल अझीझ पंजवाणी, शहराध्यक्ष सतीश विधाते आदी उपस्थित होते. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, हे जनमताने सरकार असते तर राज्यात जल्लोष झाला असता. मात्र, कुठेही आनंदोत्सव होत नाही. यावरून जनमत महाविकास आघाडीच्याच बाजूने होते, हे स्पष्ट होते, असा दावा त्यांनी केला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा,
Comments are closed.