Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रानडुकराची शिकार प्रकरण: मटण जप्त, आरोपी फारार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली दि,२३ डिसेंबर: आलापल्ली वनविभागा अंतर्गत येणाऱ्या अहेरी वनपरिक्षेत्रातील एका रानडुकरची शिकार केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी वन विभागाने तातडीने दाखल घेत तपास केला असता  ७:५०  किलो रानडुकराचे मटणासह इतर साहित्य जप्त केले आहे. तर या प्रकरणात अहेरी येथील प्रभुसदन वसाहत येथील संशयीत आरोपी सोनु मासा पोद्दाडी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान या शिकार प्रकरणी आणखी बडे इसम वनविभागाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वनविभागाच्या सूत्रांकडून मिळत आहे.

आलापल्ली येथील वन्यजीव संरक्षण पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांना अहेरी वनपरिक्षेत्रातील एका रानडुकरची शिकार झाल्याची माहिती मिळताच अहेरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी कु. आरती मडावी आणि पथक यांच्यासह घटनास्थळी पोहचुन परिसरात शोधमोहिम राबवीली असता संशयीत आरोपीत इसम सोनु मासा पोद्दाडी राहणार प्रभुसदन वसाहत अहेरी यांच्या शेतात मोठया गंजामध्ये ७,५० किलोग्राम रानडुकराचे मटन आढळुन आले. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. उमरदंड यांच्याद्वारे न्यायवैद्यकीय चाचणी करीता रानडुक्कराच्या मटन चे नमुने गोळा करण्यात आले. सदर प्रकरणात भारतीय वन्यजीव अधिनीयम १९७२ कलम २, २९, ३९, ४४, ५२, ५६, अन्वये वनगुन्हा क्रमांक ०८ /२०२२२  दिनांक २३/१२/२०२२ अन्वये नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणात रानडूक्कर चे मटन ७,५० किलोग्राम, गंज १ नग,सत्तुर १ नग, लाकडी खोड १ नग, ताट १ नग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, फरार आरोपीत इसम सोनु मासा पोद्दाडी राहणार प्रभुसदन वसाहत अहेरी यांच्या विरोधात शोधमोहीम सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदरची शिकार प्रकरणी ही गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक, डॉ. किशोर मानकर, आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया, गडचिरोली वनवृत्ताचे विभागीय वन अधिकारी जमीर शेख व आलापल्लीचे उपविभागीय वन अधिकारी नितेश शंकर देवगडे यांच्या मार्गदर्शना खाली करवाई करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी कु. आरती मडावी व वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर हे करीत आहेत. सदर कार्यवाही मध्ये क्षेत्र सहाय्यक राजेश पिंपळकर , वन्यजीव संरक्षण पथकाचे वनरक्षक अनिल पवार, रुपेश तरेंवार, नितेश मडावी, रसिका मडावी, चंद्रशेखर नागुलवार, वनमजुर बडु आत्राम, नानय्या येल्लुर व वाहण चालक सचिन डांगरे, महादेव यांचा सहभाग होता.

Comments are closed.