Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एका मृत्यूसह आज 58 नवीन कोरोना बाधित तसेच आज जिल्ह्यात 61 कोरोनामुक्त.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,दि.11नोव्हें: एका मृत्यूसह कोरोनाचे जिल्हयात 58 नवीन बाधित आढळून आले. तर आज 61 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6695 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5931 वर पोहचली. तसेच सद्या 697 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 67 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यू यामध्ये चामोर्शी तालुक्यातील 55 वर्षीय विष घेतलेल्या पुरुषाचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.59 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.41 टक्के तर मृत्यू दर 1.00 टक्के झाला.

नवीन 58 बाधितांमध्ये गडचिरोली 28, अहेरी 13, आरमोरी 3, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 2, कुरखेडा 1, मुलचेरा 2, सिरोंचा 3 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 61 रूग्णांमध्ये गडचिरोली 24, अहेरी 4, आरमोरी 4, भामरागड 18, चामोर्शी 3, धानोरा 0, एटापल्ली 3, मुलचेरा 0, सिरोंचा 0 कोरची 1, कुरखेडा 3, व वडसा मधील 1 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील संकल्प पोलीस मुख्यालय 1, शाहु नगर 1, मसाली 1, रामनगर 3, गोकुलनगर 2, विवेकनंद नगर 3, टी पाँईट 1, कन्नमवार वार्ड 1, नवेगाव 1, मुडझा 1, स्थानिक 8, फुले वार्ड 1, उसेगाव 1, आरटीओ कार्यालयाजवळ 1, कॅम्प एरीया 1, रामपुरी वार्ड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 1, स्थानिक 2, आलापल्ली 3, महागाव 1, मोडुमडगु 1, देवलमारी 1, वेलगुर 1, स्थानिक 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 1, स्थानिक 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये पवनी 1, मेंढा 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये दवंडी 1, भुरीयादंड 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये कढोली 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये गणेश नगर 1, मालेझरी 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये चिंतारेवाला 1, स्थानिक 2, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये असा समावेश आहे. तसेच इतर राज्यातील व इतर जिल्ह्यामधील यामध्ये जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.