वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
चांदाळा मार्गावर वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, सुधा अशोक चिलमवार रा इंदिरानगर (58) असे मृतकाचे नाव .
गडचिरोली, दि. १६ डिसेंबर: गडचिरोली उपवनक्षेत्रातील चांदाळा बीटामधील कक्ष क्रमांक १७४ मध्ये सुधा अशोक चिलमवार रा. इंदिरानगर गडचिरोली अंदाजे वय ५८ वर्ष हिला वन्यप्राण्याने हमला करून आज रोजी दुपारच्या १.३० वाजताच्या सुमारास मारले असल्याची माहिती मिळाल्यावरून सोनल भडके, सहाय्यक वनसरंक्षक (रोहयो) गडचिरोली वनविभाग व डी.व्ही. कैलुके, वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली (प्रादे.), पी.ए.जेनेकर, क्षेत्रसहायक, गडचिरोली, अरुप कन्नमवार, क्षेत्रसहायक, गुरवळा व अधिनस्त संपुर्ण वनाधिकारी/कर्मचारी यांनी घटना स्थळावर जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी 5 ते 6 स्त्रीया घटना स्थळावर आढळुन आल्या. त्यांनी सांगीतले की, आम्ही इंदिरानगर गडचिरोली येथील रहिवासी असुन आम्ही सरपणाकरीता जंगलामध्ये आलेलो होतो. सरपणगोळा करीत असतांना आमच्या सोबत असलेल्या सुधा अशोक चिलमवार रा. इंदिरानगर गडचिरोली अंदाजे वय 58 वर्ष या महिलेला हिस्त्र वन्यप्राण्यांने हमला करुन ठार मारले व तीथुन काही अंतरापर्यंत ओढत नेले तेव्हा आम्ही आजुबाजुलाच सरपण गोळा करीत असतांना आम्ही पळुन गेलो व आरडा ओरड केली व वनविभागाला कळविले.
तेव्हा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोका स्थळी येवुन पाहणी केली सोबतच पोलीस निरीक्षक मेश्राम व पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या उपस्थीतीत मोका पंचनामा करुन सदर मृत महिलेचे शव जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे शवविच्छेदना करीता पाठवण्यात आले.
मोका स्थळावरच्या पाहणी वरुन आढळुन आलेल्या पगमार्क वरुन सदर महिलेला वाघाने हमला केलेला असवा असा अंदाज वर्तविला जात आहे. सदर घटनेची चौकशी उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी , सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी डि.व्ही.कैलुके करीत आहे.
Comments are closed.