Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, मोहफुल वेचणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ३१ मार्च: जिल्ह्यातील मूल-चंद्रपूर मार्गावरील आगडी येथील एक महीला गावानजीकच्या  जंगलात मोह वेचण्यास गेली असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्या महिलेवर हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

आगडी येथील कल्पना नामदेव वाढई (५४) असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या सर्वत्र मोहफुल बहरलेले  आहेत. ग्रामिण भागात मजुरी नसल्यामुळे बरेच नागरिक मोहफुल वेचुन त्याच्यावर आपले उदर निर्वाह करत असतात. अशातच आगडी येथील कल्पना नामदेव वाढई (५४)  आणि तीची आई कौशल्या मांदाळे आज गावाला लागूनच असलेल्या जंगल परिसरात दोघेही मोहफुल वेचायला गेले. मोहफुल खुप उशिरा पर्यंत पडत असल्याने कल्पना वाढई हिची आई कौशल्या मांदाळे ही मातारी असल्याने ती जेवन करायला घरी निघून गेली. अश्यातच कल्पना मात्र उशीर झाला तरी घरी परत आली नसल्याने नातू उमेश वाढई याला सांगीतले. तेव्हा उमेश जंगलात जाऊन आपल्या आई कल्पनाचा शोध घेतला मात्र ती दिसली नाही. त्यानंतर तो गावामध्ये येऊन गावकऱ्यांना घेऊन गेले असता कक्ष क्रमांक ११५ मध्ये कल्पना ही मृत अवस्थेत आढळुन आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

       अंगावरील घावामुळे कल्पनाला वाघानेच मारले याची खाञी झाल्यानंतर सदर माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. येथील वनपाल प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले, वनपरीक्षेञाधिकारी राजुरकर, चौधरी, चिरोली पोलीस चौकीचे पठाण, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, दामोधर लेनगुरे व गावकरी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा अधिक तपास वनविभागाचे वनकर्मचारी करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.