मराठवाडा आणि विदर्भास जोडणाऱ्या प्रस्तावित जालना- खामगाव रेल्वे मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे
माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अर्जुनराव खोतकर यांनी केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना डेस्क 06 जानेवारी:- मराठवाडा आणि विदर्भास जोडणाऱ्या प्रस्तावित जालना- खामगाव रेल्वे मार्गाचे काम साठ वर्षानंतरही प्रलंबित असून व्यापार, उद्योग व दळण-वळणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणाऱ्या या लोहमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी शिवसेना नेते ,माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अर्जुनराव खोतकर यांनी केली आहे.
मध्य रेल्वेच्या सुरक्षा समितीचे उपमुख्य प्रबंधक सुरेश जैन व समितीने आज बुधवारी जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत सभापती श्री अर्जुनराव खोतकर व संचालक मंडळ यांच्याशी सविस्तर संवाद साधला.
रेल्वे सुरक्षा समितीस दिलेल्या लेखी पञात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले ,जालना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील नावाजलेली बाजारपेठ असून या बाजारपेठेत मराठवाड्यासह , विदर्भ व संपूर्ण महाराष्ट्रातून शेतमाल विक्री येत असतो. प्रामुख्याने गहू, ज्वारी ,बाजरी, मका ,सोयाबीन ,तूर, मूग, उडीद, हरभरा, कापूस, रेशीम, गुळ यांसह मोसंबी, डाळिंब ,द्राक्ष ,फुले व भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणावर असल्याचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी समिती च्या निदर्शनास आणून दिले.
बियाणांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरात स्टील, कापड ,पत्रा उद्योग, मोठ्या प्रमाणावर असून प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पामुळे व्यापार व उद्योग वाढीसह रोजगारास चालना मिळणार आहे. असे सांगून श्री खोतकर म्हणाले की, ड्रायपोर्ट मुळे विदर्भातील शेतमाल सहजरीत्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचणार असून प्रस्तावित जालना- खामगाव रेल्वे मार्गामुळे दळण- वळण अधिक सोपे होऊन रेल्वे वाहतूक स्वस्त व सोयीस्कर असल्याने ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल व अन्य वस्तू उपलब्ध होतील.
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या रेल्वेमार्गाचा लाभ होणार असल्याचे अर्जुनराव खोतकर यांनी नमूद केले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा शेतमालाला विदर्भात पाठविण्यात सदर रेल्वेमार्ग उपयुक्त असणारा आहे. एकूणच शेतकरी, व्यापारी ,उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांना फायद्याचा व सोयीसाठी असलेला मराठवाडा आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा प्रस्तावित जालना- खामगाव रेल्वे मार्ग तातडीने पूर्ण करून पन्नास वर्षापासून असलेल्या या महत्वकांक्षी प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करू दोन्ही भागातील जनतेस न्याय द्यावा.अशी आग्रही मागणी अर्जुनराव खोतकर यांनी केली.
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येऊन खूप प्रसन्नता वाटली असून बाजार समितीतील आवक जावक खूप चांगली आहे,या मार्गावरून रेल्वे चालल्यास कृषी बाजारात खूप प्रगती होऊन या पूर्ण भागाचा विकास होईल तसेच रेल्वे वाहतूक वाढेल असे म्हणत हा सर्वे लवकरात लवकर पूर्ण होऊन फलीभूत होईल अशी आशा करत असल्याचे सुरेश जैन यांनी सांगितले. कारण या ठिकाणी व्यापार उद्योगासाठी चांगला भाग असून ड्रायपोर्ट येथे आल्यामुळे जालना आणि बुलढाणा जिल्ह्याचा विकास होणार असून जालना ते खामगाव रेल्वे मार्ग झाल्यावर या भागाचे महाराष्ट्रातील विकसित जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणार असल्याचे मत सुरेश जैन यांनी व्यक्त केले. रेल्वे सर्वेक्षण समितीने काल जालना येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना भेटी दिल्या होत्या,आज दुसऱ्या दिवशी त्यांनी जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट देत पाहणी केली.
Comments are closed.