Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यासाठी कार्यशाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ४ डिसेंबर : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय गडचिरोली, समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद गडचिरोली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे समतादूत प्रकल्प जिल्हा कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतीक दिव्यांग दीन व समता पर्व निमित्ताने सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली नंतर भारतीय संविधान उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

शशिकांत शंकरपुरे यांनी मार्गदर्शन करतांना दिव्यांग होण्याची कारणे सांगताना व्यसनाधीनता सुद्धा कारणीभूत असते. दिव्यांगाचे २१ प्रकार आहेत हे सुध्दा सांगीतले, दिव्यांगासाठी विविध कार्यालय कडून खर्च न करता एकाच कार्यालय कडून खर्च करण्यात आला तर दिव्यंगाचा विकास होऊ शकतो. दहिकर सर ,एस के. बावणे व कार्यक्रमांचे अध्यक्ष पांडुरंगजी घोटेकर यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असलेल्या योजनांविषयी माहिती दिली.तसेच गणेश शेंडे समन्वयक हेल्पलाईन ज्येष्ठ नागरिक यांनी हेल्पलाईन विषयी माहिती दिली. ट्विंकल खोब्रागडे यांनी तृतीयपंथी यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या तसेच समाजानी त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा व त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत येणारे जिल्ह्यांतील दिव्यांग शाळेतली विद्यार्थी यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमांत अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, दहिकर ज्येष्ठ नागरिक, एस के बावणे, शशिकांत शंकरपुरे, पारशे मॅडम, रमेश पोट्टे, हेमंत लांजेवार, शैलेश रामटेके,जी. एम.कामडी, रुपम कोकोडे,ज्येष्ठ नागरिक, जिल्ह्यांतील तृतीयपंथी , सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय गडचिरोली येथील अधिकारी कर्मचारी, तालुका समन्वयक, जिल्हा परिषद समाज कल्याण येथील अधिकारी, दिव्यांग शाळेतील शिक्षक विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमांचे प्रास्ताविक रमेश पोट्टे प्रभारी कार्यालयीन अधीक्षक यांनी केले तर संचालन बार्टी प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांनी तर उपस्थितांचे आभार रुपाली अपराजित यांनी केले.कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तालुका समन्वयक यांनी सहकार्य केले.

 

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

300 मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

अखेर… तीन जणांचा बळी घेणारा वाघ p-2 जेरबंद

 

 

Comments are closed.