Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: 24 मार्च 2025 रोजी विर बाबुराव शेडमाके सभागृह जि. प. गडचिरोली येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र गडचिरोली यांच्या वतीने 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्य क्षयरोग दिन व टिबी मुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन दिवस म्हणुन संपूर्ण जगामध्ये माजरा करण्यात येतो. या जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन संपुर्ण जिल्हाभर जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येतात. 24 मार्च 2025 जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य पुढील प्रमाणे आहे. “Yes! We Can End TB: Commit, Invest, Deliver”. होय: आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो: प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा दया” होय आपण टीबीचा अंत करु शकतो ”

२४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुहास गाडे (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली, डॉ सतिश सोलंकी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सा.रु. गडचिरोली, डॉ. अमित साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. गडचिरोली, डॉ. प्रफुल हुलके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, जि.प.गडचिरोली, डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ. मनिष मेश्राम, छातीरोग तज्ञ, सा.रु. गडचिरोली, डॉ प्रफुल गोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प गडचिरोली तसेच टिबी मुक्त ग्रामपंचायत सोहळयाकरीता उपस्थित झालेले पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी, आशा, ईत्यादी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर जनजागरण मोहिम शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन हेमके, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, गडचिरोली यांनी केले. प्रास्ताविकामध्ये क्षयरोग हा गंभीर आजार असून या आजारावर नियंत्रण करणे व उदिष्टये साध्य करणे हे जनतेच्या सहभागाशिवाय साध्य होणार नाही म्हणून जनतेने हा कार्यक्रम सक्षम करण्याचे आव्हान केले तसेच औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगाब‌द्दल (एमडीआर) निदान व उपचार जिल्हा पातळीवर असुन त्याचा पुरेपुर फायदा (CBNAAT) व (Trua Naat) यंत्राव्दारे घेण्यासाठी जनतेला आव्हान केले. तसेच डॉ. मनिष मेश्राम, छातीरोग तज्ञ, जि. सा.रु गडचिरोली यांनी मार्गदर्शन करतांना क्षयरोग आजाराबद्दल गांभीर्यता व उपचाराबद्दल सुटसुटित निटनेटके पणानी समाजाच्या विचारासी निगडीत जनतेस मार्गदर्शन करतांना क्षयरोगावरील औषोधोपचार व निदान सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे असे सांगीतले.

अध्यक्षीय भाषणामध्ये सुहास गाडे, (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली यांनी क्षयरोग नियंत्रणासाठी आपल्या आरोग्य सेवेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा कार्यकत्या यांना क्षयरोगाबाबत औषोधोपचार व रुग्णास मिळणाऱ्या सकस आहाराबद्दल घ्यावयाची काळजी या बदल माहिती देण्यास सांगीतले. तसेच टिबी मुक्त ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या क्षयरुग्णांना प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान अंतर्गत दत्तक घेऊन त्या फुड बॉस्फेट (कोरडा पोषन आहार) देऊन त्यांना औषध उपचार देऊन प्रोत्साहीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश खडसे पी. पी. एम समन्वयक यांनी तर व आभार प्रदर्शन गीरीश लेनगुरे, एस. टि. एस. यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल चव्हाण, मनिष बोदेले, राहुल रायपूरे, लता येवले, प्रमोद काळबांधे, व इतर जिल्हा क्षयरोग केंद्र, गडचिरोली येथील कर्मचारी उपस्थित होते. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Comments are closed.