यवतमाळ मध्ये कॉंग्रेस भवनाच्या भूमीपूजनासाठी आले असताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भाजपा कार्यकर्त्यांनी दाखविले काळे झेंडे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असल्याने यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पक्ष यवतमाळ शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्यांना काळे झेंडे दाखवले.
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसने सर्वत्र गाव तिथे आंदोलन अभियानाला सुरुवात केली आहे. 31 ऑक्टोबरला गावागावात मशाल आंदोलन होणार आहे. याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथे मशाल रॅली आयोजित करण्यात आली.
तसेच काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्य सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेले मंत्री यवतमाळ शहरात आले. यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी करीत काँग्रेस नेत्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळीं सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
विज बिल 300 युनीट पर्यंत माफ व शेतकरी यांना सरसकट मदत जाहीर करावी यासाठी आंदोलन करण्यात आले आंदोलन करत असताना पदाधिकारी यांचे अंगावर ताफयातील पोलीसाचे वाहणे चढविण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री राजुभाऊ पडगीलवार शहर अध्यक्ष प्रशांतभाऊ यादव पाटील विधानसभा प्रमुख बाळासाहेब शिंदे.युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आकाश धुरट.महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मायाताई शेरे. शहर सरचिटणीस अजय खोंड. युवा मोर्चा जिल्हा महामंत्री रोहित राठोड.जिल्हा उपाध्यक्ष शुभम सरकाळे अभिषेक श्रीवास योगेश चव्हाण.राहुल मेहत्रे.सुरज जैन.सुरज विश्वकरमा.शहर सरचिटणीस यश चव्हाण.शुभमभाऊ चोरमले.अश्विन तिवारी.संकेत सवालाखे.इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.