Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

142 वर्ष जुना मोरबीतील ‘झुलता पूल’ कोसळला

141 लोकांचा मृत्यू, अनेक जखमी, दुरूस्तीनंतर 5 दिवसांतच कोसळला पुल, नेमकी चुकी कोणाची?, 100 लोकांची क्षमता असतांना 400 लोक उपस्थित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गुजरात,  31 ऑक्टोबर :-  गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील ‘झुलता पुल’ अचानक कोसळला असून या अपघातात 141 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी आहेत. नदीत पडलेल्या लोकांचा शोध सुरू असून एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून बचाव कार्य युध्दपातळीवर असल्याची माहिती गुजरात सरकार ने दिली आहे. ही दुर्घटना काल 30 ऑक्टोबर संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली आहे. अपघाताच्या वेळी ब्रिजवर सुमारे 500 लोक होते. मात्र या पुलाची क्षमता 100 लोकांची असून 500 लोक कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय 5 दिवस आधीच या पुलाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून नुकताच हा पुल लोकांसाठी खुला करण्यात आला होता. मग 5 दिवसातच पुल कसा तुटला? पुलावर इतक्या मोठ्य संख्येने लोकांना परवानगी का देण्यात आली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुलाची देखभाल दुरूस्ती करणार्या कंपनींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अधिक चैकशीसाठी एसआयटीची ही स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या अधिकार्यांशी चर्चा केली आहे. बचावकार्यासाठी तातडीने पथक पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

या घटनेशी संबंधित अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. काही खोडकर लोक जाणीवपूर्वक पूल हलवत होते हे स्पष्ट दिसत आहे. त्यांना थांबविण्यात आले, मात्र त्यांनी ऐकले नाही. पूल तुटण्याचे हे प्रमुख कारण असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोरबीतील आकर्षणाचा केंद्र होता झूलता पूल

मोरबीतील मच्छू नदीवर 1880 मध्ये बांधलेला हा झुलता पुल तब्बल 140 वर्ष जुना आहे. त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन करण्यात आले होते. या पूलाची लांबी 765 फूट होती तर रूदी 2.25 मीटर होती. हा पुल गुजरातच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. यथे दररोज मोठ्या संख्येने लोक येत असतात. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा झुलता पुल आहे. ऋषिकेशमधील राम आणि लक्ष्मण झुल्यासारखाच हा पूल होता. त्यामुळे इथे मोठ्या संख्येने लोक यायचे. रविवारी या पुलावर जवळवास 500च्या वर लाक एकत्रित जमल्याने पुलाला भार सहन नाही झाला व पुल नदीत कोसळला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्की चुक कुठे झाली?

हा पूल 6 महिन्यांपासून देखभाल आणि नुतनीकरणसाठी बंद होता. सुमारे दोन कोटी खर्चून हे काम पूर्ण झाले. 25 ऑक्टोबर रोजी हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र त्यासाठी परवानगी घेण्यात आली नाही.

हे देखील वाचा :-

 

Comments are closed.