Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

गुवाहटी: आसामचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. त्यानंतर गोगोई यांना 2 नोव्हेंबरला गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये (जीएमसीएच) दाखल करण्यात आले होते. शनिवारी प्रकृती खालावल्याने गोगोई याना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तरुण गोगोई यांना 2 ऑगस्टला कोरोना विषाणूची लागण झाली होती. दुसर्‍याच दिवशी त्यांना जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर, 25 ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यांच्यावर पोस्ट कोविड उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांना यश आले नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.