अजब लग्नाची गजब गोष्ट. नवरदेवाला मटणाची मागणी भोवली, वधूने दिला लग्नालाच नकार..
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
संबलपूर (ओडिसा ), 15 जून – म्हणतात ना लग्नच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. ते ज्याच्याशी व्हायचं त्याच्याशी होत, आणि कुणाशी होता होता टाळतं. अशीच एका लग्नाची गजब गोष्ट घडली आहे. मंडपात आलेल्या वराच्या ‘नो मटण नो मॅरेज’ मागणीवर वधू पक्षाने मटन संपले असल्यामुळे मटणा ऐवजी चिकन किंवा मच्छी खाण्याची विनंती केली, मात्र वर पक्ष काही आपल्या मटणाच्या मागणीवरून हटायला तयार नव्हते, शेवटी वधू ने कठोर निर्णय घेत थेट लग्नच रद्द केल्याने एकच खळबळ उडाली.
ओडिसा राज्यातल्या संबलपूर जिल्ह्यातील धामा भागात असलेल्या वधूच्या घरी ही विचित्र घटना घडली आहे. वर हा मूळचा संबळपूरचा रहिवासी आहे. संबळपूरहून येथील वराला रिकाम्या हाताने परतावे लागले जेव्हा वधूने वऱ्हाडी मंडळींसाठी मटण मागितल्याने वधूने लग्न मोडले.
एका राष्ट्रीयीकृत बँकेत बँकर असलेल्या वराने रविवारी बारात्यांसह मिरवणूक काढली आणि संबलपूरमधील ऐंथापली येथे वधूच्या घरी पोहोचला. मेजवानीच्या वेळी शेवटच्या सात-आठ वऱ्हाडयांना मटण कमी पडते. आधीच रात्री उशीर झाला होता आणि वधूच्या कुटुंबीयांनी त्या वेळी मटणाची व्यवस्था करण्यास असमर्थता दर्शवली, मात्र वऱ्हाड्यांची मटणाची मागणी लवकरच एका वेगळ्याच समस्येत बदलली. वऱ्हाड्यांच्या वागण्याने नाराज झालेल्या वधूने चक्क लग्नच न करण्याचा निर्णय घेतला.
या घटनेबद्दल बोलताना वधू म्हणाली, “सर्व काही व्यवस्थित होते. अगदी मटण पण दिले होते. पण शेवटचे सहा-सात जण जेवायचे बाकी असताना मटण संपले. मग त्यांनी माझ्या वडिलांवर गैरव्यवस्थापनाचा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली.” “माझ्या पालकांनी आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना शांत राहण्याचा आग्रह केला आणि मटण ऐवजी चिकन आणि मासे देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्या मटणाच्या मागणीवर ठाम होते आणि त्यांच्याशी गैरवर्तन करू लागले. .”माझ्या वडिलांनी त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन विनवणी केली, पण ते अविचल राहिले. हे मला चुकीचे वाटले आणि मी त्यांना लग्न न करता तेथून निघून जाण्यास सांगितले,” ती पुढे म्हणाली.
दुसरीकडे, वराच्या बाजूने आरोप करण्यात आला आहे की, वधूची बाजू पूर्णपणे निराधार आहे.“त्यांनी सांगितले की 200 वऱ्हाड्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीत आम्ही सुमारे 150 लोक होते आणि त्यापैकी अनेकजण जेवले नव्हते. माझ्या वडिलांनी जेव्हा वधूच्या काकांना ही माहिती दिली तेव्हा त्यांनी आमच्याशी गैरवर्तन केले. लग्न रद्द होण्यामागे मटण हे कारण नाही,” असे वर म्हणाला, “त्यांच्यात रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत चर्चा झाली. मी लग्नासाठी अनेक वेळा विनंती केली पण त्यांनी नकार दिला, असे वराचे वडील म्हणाले.
हे पण वाचा :-
Comments are closed.