Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बेशुद्धीचे औषध देऊन मांत्रिका कडून महिलेवर अत्याचार

लोकस्पर्श न्यूज  नेटवर्क

वृत्तसंस्था दि १५ जानेवारी :- राजस्थानमध्ये एका मांत्रिकाने एका महिलेवर दहा दिवस बलात्कार केला आहे . एक विवाहित महिला आपल्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी या मांत्रिकाकडे गेली होती . तेव्हा या मांत्रिकाने तिला दहा दिवस डांबून तिच्यावर अत्याचार केले.

राजस्थानमध्ये एक महिला आपल्या आयुष्याच्या समस्या घेऊन एका मांत्रिकाकडे गेली होती . त्यावर मांत्रिकाने तिला सर्व समस्यावर उपाय असल्याचे सांगितले नंतर तिला खाण्याच्या माध्यमातून बेशुद्धीचे औषध दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महिला जेव्हा बेशुद्ध झाली तेव्हा या मांत्रिकाचे तिचे अपहरण केले आणि बंगळूरला घेऊन गेला . तिला डांबून दहा दिवस तिच्यावर अत्याचार केला . या मांत्रिकाच्या तावडीतून कशीबशी सुटून पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली . या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिका विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेणे सुरू आहे.

Comments are closed.