लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
Delhi Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे.
तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सातत्यानं विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे, यावर देखील या पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोगानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे:
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना कधी निघणार?- 10 जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- 17 जानेवारी
उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख- 18 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी
मतदानाची तारीख- 5 फेब्रुवारी
निकालाची तारीख- 8 फेब्रुवारी
दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. या निवडणुकीत ‘आप’ने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला अवघ्या 8 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने दिल्लीत वर्चस्व राखले.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे, यावेळी दिल्लीमध्ये भाजप विरूद्ध आप असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. कोण बाजी मारणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
Comments are closed.