Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिनेमागृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, गाईडलाईन्स जारी

सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 31 जानेवारी:- भारतातील सिनेमाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने 1 फेब्रुवारीपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमा हॉल सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार थिएटर आणि मल्टिप्लेक्समधील लोकांच्या बसण्याची क्षमता ही एसओपीचं पालन करून सध्याच्या 50 टक्क्यांवरून 100 टक्के करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एसओपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, सभागृहाच्या आवाराच्या आतमध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षा विषयक उपायांची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. सामान्य मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, श्वसन विषयक शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक आहे, चेहऱ्यावर मास्क वापरणे, सभागृहात आणि बाहेर किमान 6 फूट आणि जास्तीत जास्त सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे.लोकांना सिनेमागृहाच्या आतमध्ये असलेल्या स्टॉलवरून पदार्थ खरेदी करता येतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. सार्वजनिक ठिकाणी, प्रतिक्षा कक्षांमध्ये थुंकणे प्रतिबंधित असेल आणि आरोग्य सेतूचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.

सिनेमागृहात येणाऱ्या प्रत्येकाचे प्रवेशद्वाराशी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग झाले पाहिजे. येथील गर्दी टाळण्यासाठी रांगेत उभे राहून ही प्रक्रिया पार पाडावी. एक स्क्रीन किंवा अनेक स्क्रीन असलेल्या सिनेमागृहांमध्ये मध्यंतराच्या वेळी प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या दाराजवळ गर्दी टाळण्यासाठी लोकांना रांगेने बाहेर पडता यावे, याकरिता पुरेसा वेळ दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या वेळांची विभागणी केली जाईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.