जम्मू-काश्मीर सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
- चार दहशतवाद्यांना कंठस्नान
- पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने शालगुल जंगलात शोधमोहीम सुरू केली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
श्रीनगर डेस्क, 24 फेब्रुवारी :- अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. सिरहामा भागात सुरक्षा दलाला दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर परिसरात सुरक्षा दलाने घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील शालगुल जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली. पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने शालगुल जंगलात शोधमोहीम सुरू केली. काही वेळात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजून गोळीबार सुरू झाला. यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. परंतु त्यांनी गोळीबार सुरुच ठेवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही दोन-तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरूच आहे.
Comments are closed.