Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्रिकेटपटू रोहित शर्मा झाला अलिबागकर

मांडवा जवळ सारळ इथं खरेदी केली ४ एकर जागा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क, दि. १४ डिसेंबर : क्रिकेटपटू रोहित शर्मा आता अलिबागकर झाला असुन त्याने अलिबाग तालुक्यात मांडवा बंदराजवळ सारळ येथे ४ एकर जमिन खरेदी केली आहे. या जागेचा व्यवहार ९ कोटी रुपयांना झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आज या जागेचे खरेदीखत रजिस्टर करण्यासाठी रोहित शर्मा आपली पत्नी रितिका हिच्यासह अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात  गेले होते. रोहित शर्मा आल्याचे कळताच अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

प्राप्त  माहितीनुसार रोहित शर्मा पाठोपाठ ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे देखील लवकरच अलिबागकर होणार आहेत. अलिबाग तालुक्यात ते जागा आणि रो हाऊस खरेदी करणार असल्याचे समजते.

 

 

 

हे देखील वाचा : 

महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित

दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणाची केली निर्घुण हत्या! 

 

 

 

Comments are closed.