Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धनुष्यबाण चिन्हाबाबत उध्दव ठाकरें यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर :- शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयला आव्हान देणारी उध्दव ठाकरेंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेत  फूट पडल्यानंतर पक्षचिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला होता. आता याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेत धुनष्यबाणाचे चिन्हंच गोठवले. या विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने न्यायालयात धाव घेत हा निर्णयच रद्द करण्याविषयी याचिका दाखल केली होती. मात्र, उध्दव ठाकरेंच्या पक्षाला धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मागची संकटे काही केल्या कमी होतांना दिसत नाही आहेत. मागच्या 3 महिन्यांपूर्वी पक्षातील आमदार फुटले. त्यानंतर काही महिन्यांनी पक्षाचे चिन्ह गेले. मागच्या 3 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेने सोबत बंडखोरी करत भाजपासोबत हातमिळवणी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवून टाकले. शिवसेना कोणाची हे ठरेपर्यंत शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले आहे. यानंतर शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उध्दव ठाकरेंनी दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.