Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंदी महासागरात जहाजातून तब्बल 25,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

नवी दिल्ली NCB ची मोठी कारवाई

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नवी दिल्ली, 15 मे – अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणि भारतीय नौदल यांनी संयुक्त कारवाई करताना हिंदी महासागरातून शनिवारी विशेष कारवाई करताना 25,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, उच्च दर्जाच्या मेथॅम्फेटामाइनची मोजणी पूर्ण झाली असून एकूण 2,525 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले आहे आणि याची किंमत अंदाजे 25,000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

आर्थिक मूल्याच्या दृष्टीने देशातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. एनसीबी आणि नौदलाने हिंदी महासागरात यशस्वी ऑपरेशन केले. इराणमधील चाबहार बंदरातून या ड्रग्जची उत्पत्ती झाली असली तरी स्रोत पाकिस्तान आहे. हे जहाज समुद्रातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते. वेगवेगळ्या देशांतून छोट्या बोटी मुख्य जहाजांमधून माल गोळा करायच्या आणि श्रीलंका, मालदीव आणि भारतापर्यंत पोहचवायच्या. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली होती आणि या कारवाईत एनसीबी पथकाने सुमारे 4,000 किलो विविध ड्रग्ज जप्त केले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.