Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नेपाळमधील आंतरराष्ट्रीय खेळात चमकले गडचिरोलीचे अकरा “हिरे”

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 05 जुलै – गडचिरोलीतील विविध खेळातील तथा वयोगटातील 11 खेळाडूंनी 28 ते 30 जूनला झालेल्या नेपाळ, पोखरा येथील रंगशाळा स्टेडियम मध्ये झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय इंडो -नेपाळ चॅम्पियनशिप मध्ये पाच सुवर्ण व सहा रजत पदकाची कमाई भारताला मिळवून दिली. खेळातील हिरेरुपी अकराही खेळाडूंनी प्रतिस्पर्धी आंतरराष्ट्रीय खेळाडूला धोबीपछाड करीत गडचिरोलीचे नाव अजरामर केल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील या खेळाडूंनी यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर वैयक्तिक तथा सांघिक खेळात सहा सुवर्ण, दोन रजत व तीन कास्य पदकांची कमाई केली होती. आता नेपाळमध्ये झालेल्या 14 वर्षे वयोगटात बॅडमिंटन सिंगल मुलांमध्ये प्रेम गाईन व मुलींमध्ये तमन्ना सरकार हिने सुवर्णपदकाला गवसणी घालून बाजी मारली. सतरा वर्षाखालील वयोगटात सुरज विश्वास याने फुटबॉल संघात बाजी मारून संघाने सुवर्णपदक जिंकले. याच गटात मिस्टी मुजुमदार हिला गोल्फ मध्ये रजत, शिवाशिष दास व इंद्रजीत मित्र यांनीही बॅडमिंटनच्या दुहेरी प्रकारात रजत पदक पटकाविले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच युवराज गाईंनी पावर लिफ्टिंग व सुरज मिस्त्री याने गोल्फ मध्ये 17 वर्षे गटात रजत पदक जिंकले. 21 वर्षाखालील गटात अथलेटिक्स मध्ये 100 मीटर दौड करिता धनंजय दास याने सुवर्णपदक हासील केले. तसेच वासुदेव बिस्वास हा असलेल्या कबड्डीच्या चमुने सुवर्णपदक घेतले. खुल्या महिला गटात पावर लिफ्टिंग मध्ये बिस्टी पाल हिने सुवर्णपदकाला गवासणी घातली.

श्रीनगर येथील रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यवस्थापक असलेले व विदेशी चलन बदलीचे कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र स्पोर्ट असोसिएशनचे सचिव कुमारसानू मुजुमदार हे यांचे मार्गदर्शक आहेत. महिला कोच म्हणून रमा मुजुमदार आहेत.यानंतर सर्व खेळाडू भारतासाठी इटली व भूतान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळात सहभागी होऊन आपली चमक दाखविणार आहेत. गर्वाची बाब म्हणजे मार्गदर्शकासह सर्व खेळाडू मुलचेरा तालुक्यातील आहेत. ही बाब जिल्ह्यातील खेळाडूंसाठी गर्वाची व आनंदाची आहे. जिल्ह्यात सुक्त खेळाडू लपलेले आहेत. त्यांनी पुढे येऊन जिद्द व मेहनतीच्या जोरावर स्वतःचे व देशाचे नाव मोठे करावे असे आवाहन कोच मुजुमदार यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.