Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशी बेमुदत संप कायम!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

*   विद्यापीठ कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा पाचवा दिवस.
*   विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच.
*   गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संप मिटेना.
*   पाच दिवसांपासून विद्यापीठाचा एक कागदही हललेला नाही.

विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे पाच दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून अद्यापही शासनाने दखल न घेणे म्हणजे न्यायासाठी झटणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची अग्नीपरिक्षाच जणू शासन घेत आहे असा कर्मचाऱ्यांचा समज होत आहे. कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करूनही शासनाने दखल न घेतल्यामुळे लोकशाही मार्गाने कर्मचारी न्याय मागण्यांकरीता रस्त्यावर उतरलेले आहे. बाळ रडत नाही तोपर्यंत माता सुद्धा त्याला दुध पाजत नाही या उक्तीप्रमाणे कर्मचाऱ्यांची आर्त हाक शासनापर्यंत पोहचावी या भावनेने कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत परंतु मातेच्या भुमीकेतील अंधळ्या-बहिऱ्या शासनापर्यंत कर्मचाऱ्यांची आर्त हाक पोहचेल की नाही, की कर्मचाऱ्यांच्या अंताची वाट शासन पाहील असाही प्रश्न आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना पडत आहे,गडचिरोली दि, २२ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात गोंडवाना विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी असून बुधवार दि. 22 रोजी पाचव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन बेमुदत संप कायम ठेवला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दि. १८ डिसेंबर पासून गोंडवाना विद्यापीठातील कार्यरत गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना तसेच गोडवाना विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी संघटना या दोन्ही संघटनांनी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारचा सकारत्मक निर्णय घेण्यात न आल्यामुळे आज पाचव्या दिवशी संघटनेचे सचिव श्री. सतिश पडोळे यांनी कर्मचा-यांना संबोधित करताना जोपर्यंत शासनाकडून कोणतेही लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा संप कायम राहील असा आक्रमक पवित्रा घेतला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनानी कर्मचा-यांच्या संपास जाहिर पाठिंबा दिला असून सुरूवातीपासूनच विद्यापीठातील कर्मचा-यांनी १०० टक्के सहभाग नोंदविला असल्यामुळे पाच दिवसांपासून विद्यापीठात एक कागदही हललेला नाही. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज पुर्णत: ठप्प झाले.

विद्यापीठातील ७९६ पदाला सातवा वेतन आयोग लागू करणे, आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पूर्ववत चालू करणे, सातवा वेतन लागू केलेल्या कर्मचा-यांची ५८ महिन्याची थकबाकी त्वरीत अदा करणे, विद्यापीठ कर्मचा-यांना पाच दिवशाचा आठवडा लागू करणे, शासन निर्णयानूसार तदर्थ पदोन्नती कर्मचा-यांना द्यावी, सन २००५ नंतर नियुक्त कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अकृषि विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांची पदे भरण्यास मंजूरी देण्यात यावी, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ शासनाने लागु करावा, आदी मागण्या संदर्भात शासन दरबारी पाठपूरावा करुनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. याचा निषेध म्हणून कर्मचा-यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.

बेमुदत काम बंद आंदोलनाच्या पाचव्या दिवशी गोंडवाना विद्यापीठ यंग टिचर्स असोसिएशनच्या वतीने सचिव प्रा. विवेक गोर्लावार, पदाधिकारी प्रा. नंदाजी सातपुते व प्रा. प्रमोद बोधाने यांनी तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. एल. एच. पठाण, सचिव श्री. किशोर सोनटक्के हे आंदोलन स्थळी भेट देवून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्य महा संघाच्या वतीने शासनाकडे पाठपूरावा करण्यात येईल असे आश्वस्त केले.

आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सामाजीक उपक्रम म्हणून कर्मचारी संघटनेच्या सदस्या कु. सुचिताताई मोरे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत सर्व महिला कर्मचारी यांनी वृत्तपत्रांच्या रद्दी कागदांपासून लिफाफे तयार केले व सदर लिफाफे शासकीय रुग्णालय, गडचिरोली येथील रुग्णांना औषधी वितरीत करण्याच्या कामी देण्यात आले. आंदोलनाला विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू डॉ. कावळे, मा. अधिष्ठाता तथा वित्त व लेखा अधिकारी डॉ. रेवतकर, मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. खोंडे व प्राध्यापक डॉ. शैलेंद्र देव यांनी भेट देवून आंदोलनाला शुभेच्छा दिल्या. तसेच कालरोजी घेतलेले रक्तदान शिबिर व महिला कर्मचाऱ्यांचे सामाजीक उपक्रमांची प्रशंसा केली.

गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनचे अध्यक्ष श्री. मनोज जाधव, उपाध्यक्ष निलेश काळे, सचिव श्री. सतिश पडोळे, सहसचिव शाम कळस्कर, कोषपाल प्रविण बुराडे तथा पदाधिकारी कु. सुचिता मोरे, प्रविण पहानपटे, सुभाष देशमुख, विपीन राऊत, अविनाश सिडाम, अविनाश आसुटकर तसेच अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. गोंविंदप्रसाद दुबे, श्री. जितेंद्र अंबागडे, सचिव डॉ. हेमंत बारसागडे पदाधिकारी श्री. देवेंद्र झाडे, दिनेश नरोटे, क्रिष्णा देवीकर, प्रमोद बोरकर, संदेश सोनुले, डॉ. विजय यांच्या प्रमुख उपस्थितीसह इतर सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मोठया संख्येने बेमुदत संपात सहभाग नोंदविला.

हे देखील वाचा ,

राज्य सरकारमध्ये ९०० पदांसाठी मोठी भरती

गडचिरोली- नगर पंचायत निवडणुकीत ७५.४१ टक्के, तर ग्रामपंचायत निवडणुकीत ७३.७२ मतदान

महिला सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून मतदान केंद्रावर पिंक बूथ

.

Comments are closed.